मान्सून आज मुंबईत दाखल होण्याची शक्यता

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पोषक वातावरणामुळे मान्सून पुढील २४ ते ४८ तासांत मुंबईसह राज्याच्या उर्वरित भागात प्रवेश करण्याची चिन्हे आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात हजेरी लावणार आहे. हा पाऊस १६ जूनपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात यलो अलर्ट जारी
राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसासह ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने राज्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्येही १३ ते १५ जून या कालावधीत मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.