पगारवाढ दिली नाही म्हणून ‘शिवसेना भवना’तील चौघे कर्मचारी शिंदेंकडे

पगारवाढ दिली नाही म्हणून ‘शिवसेना भवना’तील चौघे कर्मचारी शिंदेंकडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  आमदार, खासदारांच्या बंडाळीनंतर विविध पदाधिकार्‍यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केल्यानंतर आता शिवसेना भवनात काम करणार्‍या सातपैकी चौघा कर्मचार्‍यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला. ठाकरेंनी पगार वाढवला नाही म्हणून हे कर्मचारी शिंदे सेनेत दाखल झाल्याचे स्पष्ट होत आहे.

या चौघा कर्मचार्‍यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षांतर केले. पूर्वी एकसंध शिवसेना आणि आता ठाकरे गटासाठी लोगो डिझाईनिंग आदी कलात्मक कामांसोबत सेनाभवनातील कॉल सेंटरमध्ये सातजणांचे पथक कार्यरत होते. यातील अमोल मटकर, अमित शिगवण यांच्यासह चौघांनी शिवसेना भवनाला रामराम ठोकला आहे. कमी पगारात ही टीम कार्यरत होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news