

पुढारी ऑनलाईन : मी सकाळी कार्यक्रम पाहिला. मला आनंद आहे की मी तिथे गेलो नाही. तिथे जे काही घडले ते पाहून मला काळजी वाटते. आपण देशाला मागे नेत आहोत का? हा कार्यक्रम फक्त मर्यादित लोकांसाठीच होता का? नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले. तसेच संसदेच्या जुन्या इमारतीशी आमच्या भावना जुळलेल्या आहेत अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत नव्या संसद भवनाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेत आपली बाजू मांडली. यावेळी ते म्हणाले, देशात जे काही सुरू आहे ते लोकशाहीच्या विरोधात आहे. जवाहरलाल नेहरू यांचं आधुनिक विज्ञानावर आधारित समाजकारण होतं. संसदेबाबत निर्णय घेताना विरोधकांशी चर्चा झाली नाही. या कार्यक्रमात राज्यसभेच्या अक्ष्यक्षांना का डावलंलं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आमची बांधिलकी जुन्या संसदेशीच..
इतक्या महत्वाच्या घडामोडीत सर्वांना विचारात घेतलं नाही. संसदेच्या जुन्या इमारतींशी आमच्या भावना जुळलेल्या आहेत असे सांगत, नव्या संसदेच्या उद्घाटनाचं निमंत्रण माझ्या हातात आलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केल. संसदेबाबत निर्णय घेताना विरोधकांशी चर्चा झाली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा :