बेस्ट कामगारांची वडाळा आगाराबाहेर तीव्र निदर्शने - पुढारी

बेस्ट कामगारांची वडाळा आगाराबाहेर तीव्र निदर्शने

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: बेस्ट कामगारांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित प्रश्नांची आठवण करून देण्यासाठी भाजप कामगार आघाडीने आज गुरूवारी (दि.२१) रोजी वडाळा आगाराबाहेर तीव्र निदर्शने केली.

मात्र, निदर्शनांची माहिती मिळताच बेस्ट प्रशासनाने सर्वच कामगारांची सुट्टी नामंजुर करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, या आंदोलनामुळे बेस्ट कामगारांविरोधात प्रशासन असा वाद जुंपला आहे. ( वडाळा आगाराबाहेर तीव्र निदर्शने )

याबाबत बेस्ट समिती सदस्य सुनिल गणाचार्य म्हणाले की, बेस्ट प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या आढमुठ्या धोरणांमुळे कोणाचीही रजा पास होणार नाही, असे प्रत्येक आगारात बोर्ड लावण्यात आले आहेत. ही खुप चुकीची बाब आहे. बेस्ट प्रशासनाच्या या आदेशाचा कामगार वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

तसेच ही बेस्ट कामगारांवर दडपशाही करण्यासारखेच आहे. आई खायला घालेना आणि बाप भिक मागू देईना, अशी परिस्थिती आज बेस्ट कामगारांची प्रशासनामुळे झाली आहे. जर बेस्ट प्रशासनाला आंदोलनाची एवढी भीती वाटत असेल, मग कामगारांच्या सर्व हक्काच्या मागण्या मान्य करून कराव्यात. आंदोलनाची अशी वेळच आणायला देताच कशाला? असा सवाल गणाचार्य यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : अद्भूत पश्चिम घाट

Back to top button