Ajit Pawar | ईडी चौकशीनंतर जयंत पाटील यांना फोन का केला नाही, अजित पवारांनी सांगितलं कारण | पुढारी

Ajit Pawar | ईडी चौकशीनंतर जयंत पाटील यांना फोन का केला नाही, अजित पवारांनी सांगितलं कारण

पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी (दि.२२) ईडी चौकशी झाली. ईडीकडून जयंत पाटील याची तब्बल साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. यानंतर जयंत पाटील यांनी अजित पवार यांचा विचारपूस करण्यासाठी कोणताही फोन आला नसल्याचे म्हटले होते. यावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, यापूर्वी देखील अनेक नेत्यांची चौकशी झाली. यामध्ये अनिल देशमुख, छगन  भुजबळ आणि नवाब मलिक यांची देखील ईडिकडून चौकशी झाली होती, पण त्यावेळी देखील मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे कारण देत, अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवर माध्यमांशी बोलणे टाळले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे ते म्हणाले, भाजपमध्ये गेलेल्यांची आता चौकशी होत नाही. ते सांगतात आम्हाला आता शांत झोप लागते. पण विरोधी पक्षांची चौकशी ही सूड आणि द्वेषाच्या भावनेतून होत आहेत, हे चुकीचे आहे. तपास यंत्रणांना चौकशी करण्याचा अधिकार आहे, पण काही सुगावा लागल्यास चौकशीसाठी बोलावणे योग्य असल्याचे मत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.

मविआ कायम आणि मजबूत : अजित पवार

जागा वाटपांबाबत मविआत विविध मते आहेत. परंतु यासंदर्भातील निर्णय हा वरिष्ठ नेते मंडळीच घेतील. स्टॅम्प आणून द्या, मी लिहून देतो, मविआ कायम आणि मजबूत राहणार आहे. मविआ एकत्रित रहावी यासाठीच आमचा प्रयत्न असल्याचे देखील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar : गृहमंत्र्यांनी पोलिसांना मोकळीक द्यावी

दंगली होणाऱ्या भागात राजकीय हस्तक्षेप थांबवला पाहिजे. दंगली आटोक्यात येत नाहीत, त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधिकाऱ्यांना चौकशी करण्यासाठी मोकळीक दिली पाहिजे, असा सल्ला देखील अजित पवार यांनी गृहमंत्र्यांना दिला.

हेही वाचा:

Back to top button