

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत प्रत्येक पक्षाने चाचपणी केली पाहिजे. यात काहीही गैर नाही. तथापि, जागावाटपाचा निर्णय हा मेरिटवरच होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्षाने काही समित्या नेमलेल्या आहेत. सर्व बाजूंचा विचार करून जागावाटप होईल. मेरिटवर निर्णय झाला तर अनावश्यक चर्चा थांबेल, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र हा परंपरागत काँगे्रसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. काँग्रेसची भूमिका स्पष्ट असून, महापुरुषांचा अवमान व संविधानाचा अवमान करणार्या भाजपला पराभूत करणे यासाठी आमचे काम सुरू आहे, असे ते म्हणाले. वादग्रस्त सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरू झाल्यापासून भाजपचे नेते वानखेडेंचा बचाव करण्यासाठी सरसावले आहेत. ते सरकारी अधिकारी असताना नागपूरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटले व त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला, हे संशयास्पद वाटते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक मंगळवारी (दि. 23) टिळक भवन दादर येथे होणार आहे.