खोके घेतलेल्‍यांकडेच २ हजारांच्या नोटा, त्‍यांनाच काळजी : संजय राऊत

संजय राऊत ( संग्रहित छायाचित्र)
संजय राऊत ( संग्रहित छायाचित्र)

पुढारी ऑनलाईन : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घ्‍या. निवडणूक घ्‍यायला का घाबरता? मैदानात येउन दाखवा असे आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिले. यावेळी दोन हजार रूपयांची नोट बंद होणार असल्‍याच्या प्रश्नावर बोलताना ज्‍यांनी ५० खोके घेतले आहेत, त्‍यांच्याकडेच दोन हजार रूपयांच्या नोटा आहेत. त्‍यामुळे नोटा बंद होणार असल्‍याची त्‍यांनाच भीती असल्‍याचे म्‍हणत केंद्र सरकारच्या नोटाबंदीवरही राऊत त्‍यांनी टीका केली.

महाराष्‍ट्राचे माजी राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावर बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्यासाठी सत्‍तेचा दुरूपयोग केल्‍याची टीका केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरही त्‍यांनी आक्षेप घेतला.

दरम्‍यान मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. प्रत्‍येकाला पक्षाची भूमीका मांडण्याचा अधिकार आहे. आमचा लोकसभेचा १९ चा आकडा कायम असल्‍याचं राउत म्‍हणाले. भाजपला ६० च्या आत ऑलआउट करू असं आव्हान त्‍यांनी दिले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news