मुंबईत आठवडाभर सावली? | पुढारी

मुंबईत आठवडाभर सावली?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पुढील आठवडाभर अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आल्याने उकाड्याने त्रस्त मुंबईकरांना थोडा दिलासा मिळणार आहे. मुंबईत सध्या कमाल सरासरी ३५ अंश सेल्सिअस तापमान आहे. काल पारा थोडा घसरला. काल ३१ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले.

कडक उन्हाळा सुरू असतानाच हवेतील आर्द्रता वाढल्याने प्रचंड उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. मागील आठवड्यात प्रखर उन्हामुळे मुंबईकर दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळत आहेत. राज्य आणि महापालिकेच्या आरोग्य विभागानेही तशा सूचना दिल्या आहेत. या आठवड्यात पारा सरासरी पस्तिशी राहणार असल्याने कडक उन्ह- जातून सुटका नाहीच. मात्र, ढगाळ वाता- वरणामुळे उन्हाची दाहकता कमी जाणवेल, असा अंदाज आहे. २१ ते २३ मे २०२३ या तिन्ही दिवशी वातावरण अंशतः ढगाळ राहील.

२५ आणि २७ मे रोजी स्वच्छ सूर्यप्रकाश पडेल. मात्र, २६ मे रोजी ढगाळ वातावरण असेल. ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता थोडी कमी होणार असली तरी आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने उकाडा अधिक जाणवेल.

Back to top button