मुंबईत गॅस गळतीमुळे घराला लागलेल्या आगीत ६ जण होरपळले | पुढारी

मुंबईत गॅस गळतीमुळे घराला लागलेल्या आगीत ६ जण होरपळले

पुढारी ऑनलाईन:

मुंबईतील खार पश्चिम भागातील एका घराला आज (दि.१५) सकाळी आग लागली. या आगीत एकाच घरातील ६ जण भाजले गेले असून, गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार गॅस गळतीमुळे ही आग लागली असल्याचे समजते. आग आटोक्यात आली असून कूलिंग प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

खारदंडा येथील कोळीवाड्यातील हरिश्चंद्र बेकरीजवळील चाळीला आग लागल्‍याची घटना घडली. या आगीत सहाजण जखमी झाले. ही घटना सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीच्या घटनेत दोन लहान मुलांसह जखमींना 40% ते 51% भाजले आहे, असे भाभा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

सखुबाई जैसवाल (वय 65) 45 टक्के, प्रियंका जैसवाल (26) 51 टक्के, निकिता मंडलिक (26) या 45 टक्के आणि सुनील जैसवाल (29) यांना 50 टक्के भाजले आहे. तर यश चव्हाण (वय 07) 40% तर प्रथम जैसवाल (06) 45% जखमी झाले आहेत. जखमींना आयसीयू आणि पीआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Back to top button