दादा कोंडकेंच्या १२ चित्रपटांचे हक्क ‘जैसे थे’ ठेवा : उच्च न्यायालय | पुढारी

दादा कोंडकेंच्या १२ चित्रपटांचे हक्क 'जैसे थे' ठेवा : उच्च न्यायालय

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : चित्रपट अभिनेते- निर्माते दिवंगत दादा कोंडके यांच्या १२ चित्रपटांच्या कॉपीराईटसह संबंधित इतर सर्व हक्क पुढील आदेशापर्यंत ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दादा कोंडके यांच्या ट्रस्टला दिले. चित्रपटांच्या हक्कांवर दावा करीत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी हे आदेश दिले.

दादा कोंडके यांच्या १२ चित्रपटांच्या हक्कांसदर्भात एव्हरेस्ट एंटरटेनमेंट लिमिटेडने दादा कोंडके यांच्या नावाने असलेल्या शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान या ट्रस्टविरुद्ध याचिका दाखल केली आहे. त्याची दखल घेत न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी दादा कोंडके यांच्या १२ चित्रपटांचे कोणतेही हक्क त्रयस्थ पक्षकाराला न देण्याचा आदेश शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठानला दिला.

बॉम्बे फिल्म एंटरप्रायझेस प्रा. लि. आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. या कंपन्यांनी त्यांच्या ताब्यातील १२ चित्रपटांच्या निगेटिव्ह / प्रिंट पॉझिटिव्ह वा इतर कोणतेही साहित्य शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान या ट्रस्टसह विश्वस्त वा अन्य कोणालाही सुपूर्द करू नये, असाही आदेश दिला.

Back to top button