प्रत्येक विकेन्डला शीव उड्डाणपूल राहणार बंद; मुंबईकरांचा त्रास वाढणार

प्रत्येक विकेन्डला शीव उड्डाणपूल राहणार बंद; मुंबईकरांचा त्रास वाढणार
Published on
Updated on

प्रत्येक विकेन्डला शीव उड्डाणपूल राहणार बंद राहणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने शीव अर्थात सायन उड्डाणपुलाचे सांधे बदलण्याचे काम हाती घेतल्याने उभ्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. कारण एमएसआरडीसीने सांधे बदलण्याच्या कामासाठी प्रत्येक विकेन्डला शुक्रवारी रात्री १० ते सोमवारी पहाटे ५ या वेळेत शीव उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे ठरवले आहे. परिणामी, उपनगराकडून सकाळी मुंबईकडे येणाऱ्या सायंकाळी मुंबईतून उपनगराकडे जाणाऱ्या वाहन चालकांना अर्ध्या तासाऐवजी आता कोंडीमुळे २ तास खर्ची घालावे लागणार आहेत.

याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले की, एमएसआरडीसीने सांधे बदलण्यासाठी या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे काही मार्गांत वाहतूक पोलिसांनी बदल केले आहेत. आजपासून प्रत्येक शुक्रवारी रात्री १० ते सोमवारी पहाटे ५ या कालावधीत शीव उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवला जाईल. ९ जानेवारी २०२२ पर्यंत अशाचप्रकारे दर विकेन्डला उड्डाणपुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येईल. मुंबईकरांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शीव सर्कल येथे खासगी ट्रॅव्हल्स बसेसना प्रवेश बंदी व वाहन थांबविण्यास निर्बंध घातले आहेत. याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील अरोरा जंक्शन ते हायवे अपार्टमेंट दरम्यानच्या दोन्ही मार्गिंकावर खासही बसेसना बंदी असेल. याउलट दक्षिण मुंबईकडून येणाऱ्या खाजगी प्रवासी बसेसना अरोरा जंक्शन येथुन उजवे वळण घेवून पुढे वडाळा ब्रिजवरून बरकत अली नाकामार्गे वडाळा वाहतुक विभागाच्या हद्दीतून बीपीटी रोडमार्गे वडाळा टी.टी. रोडवरून ठाणे किंवा पनवेलच्या दिशेने जाण्यास मुभा असेल, अशी माहिती वाहतूक विभागाचे मध्य मुंबईचे पोलीस उप आयुक्त राज तिलक रौशन यांनी दिली.

शीव उड्डाणपूल :  मुंबईकरांनो विकेन्डला असे असतील मार्गांत बदल…

दक्षिण मुंबईकडून येणारी अवजड वाहने अरोरा जंक्शन येथे उजवे वळन घेवून पुढे चार रस्ता येथे उजवे वळन घेवून वडाळा पुलावरून बरकत अली नाका, छत्रपती शिवाजी चौक, बरकत अली दर्गारोड, (शिवडी चेंबूर लिंक रोड) भक्ती पार्क, वडाळा आणिक डेपो रोड व त्यानंतर पुढे आहूजा ब्रिज मार्गे त्यांच्या इच्छीत ठिकाणी मार्गक्रमण करतील.

दक्षिण मुंबई कडून येणाऱ्या अवजड वाहनांना अरोरा जंक्शन यथून चार रस्त्याकडे उजवे वळण यापुर्वी नव्हते. परंतु वाहतूक पोलिसांच्या नव्या आदेशानुसार या ठिकाणाहून वाहनांना उजवे वळण देण्यात आलेले आहे.

माझगाव, रे रोड, काळाचौकी येथून चार रस्त्याने येणारी अवजड वाहने वडाळा पुलाखालून डावीकडे वळण घेवून वडाळा पुलावरून बरकत अली नाका, शांतीनगर, भक्ती पार्क, आणिक डेपो, अहुजा पुलावरून नवी मुंबई व ठाणेकडे जाऊ शकतील.

मुंबई गोदी किंवा दक्षिण मुंबईतुन बिपीटी रस्ता मार्गे येणारी अवजड वाहने शिवडी लिंक रोडने वडाळा आणिक डेपो, आहुजा ब्रिजवरून येवून पूढे ठाणे किंवा चेंबुरच्या दिशेने जातील.

सायन रुग्णालय येथून येणारी वाहने सायन रुग्णालय जंक्शन येथे डावे वळण घेवून सुलोचना शेट्टी मार्गाने माहिम-वांद्रेच्या दिशेने मार्गक्रमण करतील.

शीव जंक्शन येथून डावे वळण घेऊन वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना शीव सर्कल येथुन रोड क्रमांक ६ (आर. एल. केळकर) मार्गाने डावे वळण घेऊन स्वामी वल्लभदास मार्गाने देशपांडे चौक येथे येवून पुन्हा डावे वळण घेऊन शीव रेल्वे स्थानकमार्गे पुढे कुर्ला पश्चिमेकडील एलबीएस मार्ग किंवा वांद्रेच्या दिशेने जाता येईल.

माहिम कुंभारवाडा येथुन येणारी अवजड वाहने शीव रुग्णालय पुलाखालुन उजवे वळण घेवून एम.जी. रोड येथून चार रस्त्याने वडाळा पुलाजवळून उजवीकडे वळण घेवून वडाळा पुलावरून बरकत अली नाका, शांतीनगर, भक्ती पार्क, आणिक डेपो, अहुजा पुलावरून पुढील मार्गासाठी रवाना होऊ शकतील.

शीव उड्डाणपूल :  कोंडी टाळण्यासाठी हे आहेत विकेन्डचे पर्यायी मार्ग

ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या दक्षिणकडून आलेली व शीव जंक्शन येथुन वांद्रेच्या दिशेने जाऊ इच्छिणारी अवजड वाहने सांताक्रूज-चेंबुर लिंक रोडने जावून पुढे सुर्वे जंक्शनवर एल.बी.एस मार्गाने त्यांच्या इच्छीत स्थळी मार्गक्रमण करतील.

ठाणे किंवा नवी मुंबई कडुन पुर्व द्रुतगती महामार्गाने येणारी अवजड वाहने एवराड नगर येथे डावे वळण घेवून वडाळा अणिक डेपो, भक्ती पार्क रोड व पुढे बीपीटी रोडने दक्षिण मुंबईत जातील.

ठाणे व नवी मुंबई कडुन येणारी वाहने तसेच पूर्व द्रुतगती माहामार्गावरून येणारी वाहने वांद्रे-कुर्ला संकुल अर्थात बीकेसी कनेक्टर ब्रिज येथे उजवे वळण घेवून वांद्रे, धारावी, वरळीमार्गे दक्षिण मुंबई जातील.

या मार्गांवर विकेन्डला पार्किंग व गाडी थांबवण्यास बंदी
  • मध्य व दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर प्रत्येक विकेन्डला वाहने पार्क व थांबविण्यास बंदी करण्यात आली आहे.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील शीव रुग्णालयने हायवे अपार्टमेंट पर्यंतचा परिसरात दोन्ही दिशेला बंदी.
  • शीव रेल्वे स्थानक मार्गावरील देशपांडे चौक ते भावना बार आणि रेस्टॉरंट या दरम्यानचा परिसरातील दोन्ही मार्गावर विकेन्डला नो पार्किंग असेल.
  • रोड क्रमांक ८ वरील शीव सर्कलने रोड क्रमांक २० दरम्यानच्या दोन्ही मार्गांवर नो पार्किंग असेल.
  • आर. एस. केळकर मार्गावरील शीव सर्कलने स्वामी वल्लभदास मार्गावरील दोन्ही मार्गिंकावर नो पार्किंग असेल.
  • शीव रेल्वे स्थानक रोडवरील जंक्शनहून देशपांडे चौक दरम्यानचा परिसरात वाहने थांबवण्यास मनाई आहे.
  • सुलोचना शेट्टी मार्गावरील शीव रुग्णालय ते रेल्वे उड्डाणपुलादरम्यानच्या रस्त्यावर वाहन थांबवण्यास बंदी आहे.
  • संपुर्ण शीव सर्कलभोवती वाहन थांबवण्यास मनाई आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news