प्रेम, शरीरसंबंध, चुकलेले लग्न.. अखेर ती पोहोचली पोलिस ठाण्यात | पुढारी

प्रेम, शरीरसंबंध, चुकलेले लग्न.. अखेर ती पोहोचली पोलिस ठाण्यात

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : फेसबूकवरुन फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवत तरुणाने एका तरुणीला आपल्या प्रेमाची कबुली दिली. होकार मिळाल्यानंतर त्याने तिला लग्नाची मागणी घातली. तिला शिवसेना कार्यालयात नोकरी लागली आणि पुढे असे काही घडले की, त्याने चक्क लग्नाला नकार दिला. ही घटना वडाळ्यात घडली. पीडित तरुणीने अखेर पोलिसांत धाव घेतली. त्यानुसारगुन्हा दाखल करुन वडाळा टी टी पोलीस तपास करत आहेत.

तक्रारदार २५ वर्षीय तरुणी सायन कोळीवाड्यात आजीसोबत राहाते. २०१९ मध्ये तिला २७ वर्षीय आसिफ ची फेसबूकवर फ्रेन्ड रिक्वेस्ट आली. तिने आसिफची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली. त्यानंतर फेसबूकच्या माध्यमातून दोघांमध्ये चॅटिंग सुरु झाली. माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे. मला तुझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहायचे आहे, असे आसिफने सांगितले. त्याने समोरासमोर भेटून बोलण्याची इच्छा व्यक्त केली. आसिफने तिला लग्नाची मागणी घातली. पुढे दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. दोघांमध्ये चार वर्षे प्रेमसंबंध सुरु होते. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये तरुणीला शिव- सेना कार्यालयात नोकरी मिळाली. पुढच्या पंधरा ते वीस दिवसांत दोघांमध्ये भांडण झाले. आसिफने तिला लग्नासाठी नकार कळवला. दोघांमधील कटूता वाढू लागली. पण, तिने त्याची समजूत घातली. लग्नाबद्दल घरी बोलण्यास सांगितले. त्यावर त्याने मला थोडा वेळ हवा आहे. योग्य वेळ आल्यावर बोलतो, असे सांगितले.

मात्र दोघांमधील वाद वाढू लागले. त्याची नाराजी वाढू लागली. त्यानंतर तिने कुटुंबीयांसह आसिफच्या वडिलांची भेट घेतली. त्यांना झालेला सगळा प्रकार सांगितला. वडिलांनी समजवल्यानंतर तो लग्नाला तयार झाला. दोघांनी विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन लग्नाची तारीख काढली. मात्र आसिफ तिला टाळू लागला. त्याच्या मनात काय चालले आहे, हे कोणालाच समजत नव्हते. आसिफ लग्नाच्या तारखेला विवाह नोंदणी कार्यालयात आला नाही.

Back to top button