Sharad Pawar Resigns Updates Live | शरद पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष; निवड समितीचा निर्णय | पुढारी

Sharad Pawar Resigns Updates Live | शरद पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष; निवड समितीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीच्या समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाचा राजीनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष निवडण्यासाठी नेमण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या समितीने शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहावे असा एकमुखी ठराव मंजूर केला. दरम्यान, जोपर्यंत शरद पवार आपला निर्णय मागे घेत नाहीत तोपर्यंत हटणार नाही असा पवित्रा घेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील पक्ष कार्यालयाच्या बाहेर गर्दी केली आहे. (Sharad Pawar Resigns Updates)

आज सकाळी अकरा वाजता अध्यक्ष निवड समितीची बैठक सुरू होण्यापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा म्हणून जोरदार घोषणा देत मोठी गर्दी केली होती. स्वतः समितीचे सदस्य असलेले छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांनी बैठकीच्या आधीच शरद पवारांना अध्यक्षपद सोडता येणार नाही. त्यांनी अध्यक्षपदी कायम राहावे म्हणून बैठकीत ठराव केला जाईल असे स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही येणाऱ्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. या महत्त्वाच्या निवडणुका पहाता शरद पवारांनी अध्यक्षपद न सोडता आमचे नेतृत्व करावे, अशी भूमिका मांडली.

बैठक सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहावे असा ठराव बैठकीत मांडला. तसेच हा निर्णय त्यांनी मान्य करावा म्हणून आग्रह धरण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. त्याला सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला.

शरद पवार यांनी स्वतः कार्यकर्त्यांशी बोलताना अध्यक्षपदाबाबत निर्णय घेताना तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करणार नाही आणि दोन दिवसांनंतर तुम्हाला आंदोलन करावे लागणार नाही, असे सांगून निर्णयावर फेरविचार करण्याचे संकेत दिले होते.

शरद पवारांनी २ मे रोजी पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हलकल्लोळ सुरू आहे. त्यावर ५ तारखेला शरद पवार यांनी पक्षाचा नवा अध्यक्ष ठरविण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीची बैठक होऊन पडदा पडेल, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार समितीने निर्णय घेतला आहे.

Sharad Pawar Resigns Updates : 

प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदावर राहवे. त्यांचा निर्णय मागे घ्यावा हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला आहे. हे सांगताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कार्यालयाच्या बाहेर अतिषबाजी करण्यात आली आहे. 

प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेमध्ये  सांगितलं की, ‘शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदावर राहवे. त्यांचा निर्णय मागे घ्यावा हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला आहे. राष्ट्रवादीच्या समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा नेत्यांनी एकमताने फेटाळून लावला आहे. शरद पवारांनीच अध्यक्ष राहावे असा बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला.”आता शरद पवार काय निर्णय घेणार ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागुन राहीले आहे.

राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर होर्डिंग्ज लावले आहे. यावर लिहिले आहे,” आज ,उद्या ,परवा साहेबच. कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्ते यांनी घोषणाबाजी सुरु केली आहे.

प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव 16 सदस्यांच्या निवड समितीने फेटाळला.

शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव  प्रफुल पटेल यांनी मांडला.

राष्ट्रवादीच्या समितीची बैठक सुरु.

बैठकीसाठी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ उपस्थित. कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड उपस्थित. शरद पवार जर राजकारणात राहणार नसतील मी का राजकारणात राहू? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. शरद पवार यांनीच अध्यपदावर रहावं.

– अजित पवार, सुप्रिया सुळे. यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीच्या कार्यालयात

Back to top button