Stock Market Opening Bell | सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरला, ‘या’ घटकांचा बाजारावर परिणाम | पुढारी

Stock Market Opening Bell | सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरला, 'या' घटकांचा बाजारावर परिणाम

पुढारी ऑनलाईन : जागतिक नकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजारातील गेल्या आठ दिवसांतील तेजीला आज ब्रेक लागला. सुरुवातीला सेन्सेक्स (Sensex) सुमारे ३०० अंकांनी घसरुन ६१ हजारांवर आला. तर निफ्टी (Nifty) ९४ अंकांच्या घसरणीसह १८ हजारांवर होता. टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, एचसीएल टेक, ॲक्सिस बँक, टीसीएस, टाटा स्टील, रिलायन्स, सन फार्मा हे लाल चिन्हात खुले झाले आहेत. तर एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स हे शेअर्स वाढून व्यवहार करत आहेत. (Stock Market Opening Bell)

अमेरिकेत मंदीच्या धास्तीने येथील शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी कमजोरी दिसून आली. येथील डाऊ निर्देशांक ३७० अंकांनी घसरला. आता गुंतवणूकदारांचे फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या निर्णयाकडे लागले आहे. यामुळे त्यांनी सावध भूमिका घेतली आहे.

दरम्यान, सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैशांनी वाढून ८१.७५ वर पोहोचला. (Stock Market Opening Bell)

 हे ही वाचा :

Back to top button