Pawar Resigns : शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाचे अजित पवारांकडून समर्थन, म्हणाले…

Pawar Resigns : शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाचे अजित पवारांकडून समर्थन, म्हणाले…

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्त होण्याचा निर्णय काळानुसार घेतला आहे. तो कधीतरी घ्यावा लागणार होता. यामध्ये भावनिक होण्याचे कारण नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी शरद पवारांच्या निवृत्तीचे समर्थन केले. शरद पवार (Pawar Resigns) यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल सुरू राहिल, नवीन अध्यक्षांना ते मार्गदर्शन करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार म्हणाले की, अध्य़क्षपदावरून शरद पवार (Pawar Resigns) बाजूला गेले तरी, त्यांचे आपल्या सर्वांना मार्गदर्शन राहणार आहे. पवारांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण काम करणार आहोत. पक्षाचा नवा अध्यक्ष पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल. मी काकीशीही बोललो आहे. परंतु, शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. पवार साहेबांच्या जीवावरच यापुढे राष्ट्रवादी चालणार आहे. आपल्या परिवाराचे प्रमुख म्हणून शरद पवार राहणार आहेत.

वय झाल्यानंतर आपण दुसऱ्याला संधी देत असतो. काळानुरूप काही बदल करावे लागतात. याचा भाग म्हणून शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ते आपला निर्णय मागे घेणार नाहीत. पवार स्वत:च भाकरी फिरवायची आहे, असे म्हणाले होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मी निवृत्त होण्याबाबतचा निर्णय आज घेतला आहे, अशी घोषणा करत राष्ट्रवादीचा (NCP) नवा अध्यक्ष कोण असेल, हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ठरवावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Resigns) यांनी आज (दि. २) केले.

यावेळी पवार (Sharad Pawar Resigns) म्हणाले की, आज सकाळीच मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेली ६० वर्षांहून अधिक काळ मी राजकारण आणि समाजकारणात मी सक्रिय आहे. यापुढेही मी सार्वजनिक जीवनात कार्यरत राहणार आहे, असेही ते म्हणाले.

Pawar Resigns : कार्यकर्त्यांचा सभागृहातच निर्णयाला विरोध

शरद पवार यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर केले आणि सभागृहातच कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला. शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडू नये, अशी मागणी करत त्यांनी पवारांच्या निवृत्तीला तीव्र विरोध केला. व्यासपीठावर धाव घेत पवारांना गराडा घातला. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. काही कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी अजित पवारांनी व्यासपीठ सोडण्याचे आवाहन केले. मात्र, कार्यकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण झाले.

हेही वाचा 

logo
Pudhari News
pudhari.news