मुंबई : इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रनवेवरच ठिय्या | पुढारी

मुंबई : इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रनवेवरच ठिय्या

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा मुंबईहून नैनितालला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान रणवेवरच दोन तास खोळंबून होते. त्यामुळे दीड ते दोन तास प्रवासी देखील या विमानातच बसून होते. त्‍यामुळे मुंबई विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ पाहायला मिळाला.

अखेर प्रवाशांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी विमानाबाहेर पडून दुसऱ्या विमानाची व्यवस्था कंपनीने करावी या मागणीसाठी रणवेवरच ठिय्या मांडला. प्रवाशांचा गोंधळ वाढू लागल्‍याचे पाहून सीआयएसएफच्या जवानांना रणवेवर पाचारण करण्यात आले. या सर्व प्रवाशांना पुन्हा बसमध्ये बसवून विमानतळावर आणण्यात आले आहे. रणवेवरच प्रवाशांनी अशा प्रकारे आंदोलन केल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा : 

Back to top button