मुंबई : राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे देण्यात येणारा महाराष्ट्र विधान परिषद 'उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह निवडक विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांना जाहीर झाला असून मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. यावेळी 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व' या ग्रंथाचे प्रकाशनदेखील करण्यात येणार आहे.
विधिमंडळाच्या कामकाजातील नियमित सहभाग, नियमांचे काटेकोर पालन, विधिमंडळात उपस्थित करावयाच्या विषयांचे आकलन, विषय मांडताना वापरलेले ज्ञान, कौशल्य, निवडलेले मुद्दे, वक्तृत्व शैली, दर्जेदार उत्कृष्ट भाषणे या सर्व गोष्टी पडताळन पाहन तज्ज्ञा समितीकडून या पुरस्कारांची शिफारस केली जाते. त्यानुसार राष्ट्रकुल संसदीय मंडळाकडून हे पुरस्कार जाहीर केले जातात.
रविवारी २०१८ पासून प्रलंबित असलेले हे पुरस्कार एकूण ५३ सदस्यांना जाहीर झाले. त्यात भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांना उत्कष्ट संसदपट पुरस्कार जाहीर झाल्याने मागाठाणे विधानसभा मतदारसंघात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाच केला जात आहे.
मला घोषित झालेला 'उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार हा माझा नसून महाराष्ट्रातील तमाम जनतेचा सन्मान आहे. गोर-गरीब जनतेचे प्रश्न प्रामाणिक पाये मी सभागृहात मांडत असल्याची ही पोहच पावती मिळाल्याचे समाधान वाटते. महामहीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूली यांच्या हस्ते हा सन्मान म्हणजे सोन्याहून पिवळे असल्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी पुढारीला दिली.