फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड : आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, राजकुमार राव सर्वोत्कृष्ट अभिनेता | पुढारी

फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड : आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, राजकुमार राव सर्वोत्कृष्ट अभिनेता

मुंबई : वृत्तसंस्था : जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडलेल्या फिल्मफेअर सोहळ्यात आलिया भट्ट हिला ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील अभिनयाबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा, तर ‘बधाई दो’ चित्रपटाबद्दल राजकुमार राव याला अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.

संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ने 10 श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले, तर हर्षवर्धन कुलकर्णींच्या ‘बधाई दो’ने क्रिटिक्स अ‍ॅवॉर्ड श्रेणीत सर्वाधिक 6 पुरस्कार जिंकले. अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र भाग 1 शिवा’ या चित्रपटालाही चार श्रेणीत पुरस्कार मिळाले. ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट : गंगूबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय लीला भन्साळी (गंगूबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : राजकुमार राव (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट सहा. अभिनेता : अनिल कपूर (जुग जुग जियो)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री – शीबा चड्ढा (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट संवाद : प्रकाश कपाडिया आणि उत्कर्षणी वशिष्ठ (गंगूबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट पटकथा : अक्षय घिल्डियाल, सुमन अधिकारी आणि हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजित सिंह (‘ब्रह्मास्त्र’मधील ‘केसरिया’ गाणे)
सर्वोत्कृष्ट कथा : अक्षत घिल्डियाल आणि सुमन अधिकारी (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) : भूमी पेडणेकर (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) : तब्बू (भूलभुलय्या 2)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) : हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) : संजय मिश्रा (वध)
फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 2023 : प्रेम चोप्रा

Back to top button