पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात; तब्बल 13 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत | पुढारी

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात; तब्बल 13 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत

लोणावळा(पुणे) : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खंडाळा बोर घाटात खोपोली एक्झिट जवळ आज गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तेरा वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चार जण जखमी झाले आहे. त्यांना खोपोली येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने सदरचा ट्रक समोरील एका चार चाकी गाडीला धडकला. या अचानक झालेल्या धडकेनंतर त्या ट्रकच्या मागे इतर वाहने एकमेकांना जोरात धडकल्याने हा भीषण अपघात झाला. यामध्ये 11 चारचाकी वाहने, 1 ट्रक आणि 1 कंटेनर अशा एकूण 13 वाहनांचा समावेश आहे.

या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर सुमारे एक तास वाहनांची मोठी कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस आयआरबी आणि डेल्टा फोर्स तसेच खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते यांनी अपघात स्थळी धाव घेत सर्व वाहनांमधील जखमी आणि इतर सर्व प्रवाशांना वाहनांमधून बाहेर काढत उपचारासाठी रवाना केले.

Back to top button