महाविकास आघाडी कायम राहणार, पवारांची हिच इच्छा : संजय राऊत | पुढारी

महाविकास आघाडी कायम राहणार, पवारांची हिच इच्छा : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाविकास आघाडी कायम राहणार, ती एकत्र राहावी हि शरद पवारांची इच्छा असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. भाजपची पराभव करण्याची आमच्यात नशा आहे. यावेळी तुमच्या आजूबाजूला कोण नशेबाज आहेत, हे सांगू का? असे संजय राऊत यांनी फडणवीसांच्या ‘नशा’ टीकेला सडेतोड उत्तर दिलं.

२०२४ बाबत शरद पवारांच्या मनात साशंकता नसावी. मविआमध्ये पवारांचं महत्त्व राहणारचं. मविआ कायम राहणार. या आघाडीचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे नेते आहेत. २०२४ मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मविआ एकत्र लढेल.

राऊत म्हणाले, द्वेषाची भांग ते पिऊन बोलतात. या मुख्यंमंत्र्याचे पदावर थोडेच दिवस शिल्लक आहेत. नेत्यांची पापं धुण्यासाठी भाजपने लॉन्ड्री सुरु केलीय. ४० आमदार नामर्दासारखे पळून गेलेत. सेनेत फ्क्त आता मर्द उरलेत. ‘त्या’ पळपुट्यांनी आम्हाला शिकवू नये.

भाजपलाच सरकार जास्त काळ चालवायचं नाहीये. भाजप विरोधी पक्ष नेहमीच फोडत आहे. मोंदींचा एकेरी उल्लेख कुणीच करत नाही असेही त्यांनी नमूद केले.

हेदेखील वाचा- 

Back to top button