मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राजकिय नेत्यांची एकमेकांची खूप जवळीक असते. त्यामुळे ते खूप ठिकाणी डोळे मारतात. पण मला माहिती नाही कि कोण कोण कुठे कुठे डोळा मारत आहे, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टोला लगावला. त्यांच्या या वक्तच्याची राजकिय वर्तुळात दिवसभर चर्चा रंगली होती.
अजित पवार यांनी आपल्याला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे वक्तव्य केले असून त्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची दोस्ती कशी आहे, असे प्रश्न पत्रकारांनी अमृता फडणवीस यांना विचारले असता त्या म्हणाल्या, त्यांची दोस्ती कशी आहे हे माझ्यापेक्षा त्या दोघांनाच माहित आहे. राजकिय नेत्यांशी एकमेकांशी खूप जवळीक असते. त्यामुळे ते खूप ठिकाणी डोळ मारतात.
मुख्यमंत्री कोणी झाले तरी मला चालेल, फक्त त्यांनी योग्य काम करायला हवे. जी व्यक्ती चोवीस तास महाराष्ट्रासाठी झोकून काम करेल त्याच्यामागे मी उभी राहीन, असे त्या म्हणाल्या. मात्र, जनतेला जो माणूस आणि पक्ष योग्य वाटेल, ते न्याय देऊ शकेल असे वाटेल त्यांनी सत्तेत यावे. तेच आपल्या महाराष्ट्रासाठी चांगले आहे. तो कुणीही असो. प्रत्येक माणसाने विचार करावा की, तो फक्त प्रगतीसाठीच काम करणार आहे. स्वतःच्या घरासाठी काम करणार नाही, असेही त्या शेवटी म्हणाल्या.