

Stock Market Opening : जागतिक संकेत कमकुवत असतानाही आज शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्सने १०० अंकांच्या वाढीसह ५९,६०० वर सुरुवात केली. तर निफ्टी १७,६५० च्या वर होता. आजच्या ट्रेडिंगच्या सुरुवातीला रिलायन्स, ICICI Bank आणि एचसीएल टेक हे आघाडीवर होते. पण काही वेळातच दोन्ही निर्देशांक सपाट झाले. रियल्टी, ऑटो, मेटल स्टॉक्सवर दबाव राहिला आहे.
सेन्सेक्सवर एचसीएल टेक हा शेअर टॉप गेनर होता. हा शेअर सुमारे २ टक्क्यांनी वाढला. कोटक महिंद्रा, एशियन पेंट्स, टायटन, विप्रो आणि इंडसइंड बँक हेदेखील वधारले आहेत. टेक महिंद्रा, टाटा स्टील, टाटा मोटर्स, मारुती आणि एनटीपीसी हे घसरले आहेत. निफ्टीवर एचसीएल टेक्नॉलॉजीज, एचडीएफसी लाइफ, पॉवर ग्रिड कॉर्प हे टॉप गेनर्स होते. तर टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, डॉ. रेड्डीज लॅब्स, मारुती सुझुकी आणि टेक महिंद्रा हे घसरले आहेत.
हे ही वाचा :