पुढारी ऑनलाईन: सौर प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेततत्वावर घेण्यात येतील. यासाठी शेतकऱ्याला वार्षिक ५० हजार रुपये देण्याचा निर्णय आज (दि.१९) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
फडणवीस म्हणाले, "शेतकऱ्यांना लवकरात लवकर सोलरची वीज मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. दिव्यांग कर्मचाऱ्यांना आता पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू होणार आहे. पुणे मनपा हद्दीत निवासी मालमत्तांना दिलेली सवलत कायम तसेच दुरुस्तीपोटी फरकाची रक्कम वसूल न करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे."