पॅनकार्डला आधारकार्ड लिंक करण्याच्या नियमात बदल | पुढारी

पॅनकार्डला आधारकार्ड लिंक करण्याच्या नियमात बदल

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  पॅनला आधारशी लिंक करण्याच्या फॉर्ममध्ये बदल करण्यात आला आहे. पॅनला आधारशी लिंक करताना मूल्यांकन वर्षाचा पर्याय उपलब्ध असतो. आयकर विभागाने आता मूल्यांकन वर्ष अपडेट केले आहे. विलंब शुल्क भरण्यासाठी मूल्यांकन वर्ष २०२४-२५ निवडावे लागेल. यापूर्वी ३१ मार्च २०२३ ही अंतिम मुदत होती. त्यामुळे मूल्यांकन वर्ष २०२३-२४ निवडायचे होते.

पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही आजच्या काळात अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. ही दोन्ही कागदपत्रे नसतील तर अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते. पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या तारखेपर्यंत दोन्ही कागदपत्रे लिंक न केल्यास १ जुलै रोजी पॅन कार्ड निष्क्रिय होईल. पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी १००० रुपये दंड भरावा लागेल.

वित्त मंत्रालयाचे म्हणणे आहे की, शेवटच्या तारखेपर्यंत पॅनला आधारशी लिंक केले नाही तर त्याची तारीख पुढे वाढवली जाणार नाही. त्यामुळे लिंक न केल्यास १ जुलैपासून पॅनकार्डचा काही उपयोग होणार नाही, असे झाल्यास कार्डधारक म्युच्युअल फंड, शेअर बाजारातील गुंतवणूक करू शकणार नाहीत.

Back to top button