लता मंगेशकर पुरस्कार आशा भोसले यांना | पुढारी

लता मंगेशकर पुरस्कार आशा भोसले यांना

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यंदा या पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ गायिका आशा भोसले ठरल्या आहेत. दरम्यान, विद्या बालन, पंकज उधास, प्रसाद ओक यांच्यासह अनेकांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा प्रतिष्ठित दीनानाथ पुरस्कार आणि अन्य पुरस्कारांचा वितरण सोहळा 24 एप्रिल रोजी मुंबईत श्री षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे.

गेल्या वर्षीपासून मंगेशकर कुटुंबीय आणि ट्रस्टकडून भारतरत्न लतादीदींच्या स्मरणार्थ ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ दिला जातो. गेल्या वर्षी या पुरस्काराचे मानकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले होते. यावर्षी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार लतादीदींच्या धाकट्या भगिनी अर्थात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

विशेष वैयक्तिक पुरस्कार – पंकज उदास (भारतीय संगीत),
सर्वोत्कृष्ट नाटक – प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या गौरी थिएटर्सचे ‘मनियम व अटी लागू’
श्री सदगुरू सेवा संघ ट्रस्ट – (समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवा)
– वागविलासिनी पुरस्कार – ग्रंथाली प्रकाशन (साहित्य क्षेत्रात समर्पित सेवा)
– विशेष पुरस्कार प्रसाद ओक (चित्रपट आणि नाटक क्षेत्रात समर्पित सेवा)
विशेष पुरस्कार – विद्या बालन (चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवा).

Back to top button