…तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल : संजय शिरसाट | पुढारी

...तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल : संजय शिरसाट

पुढारी ऑनलाईन ड़ेस्क : अजित पवार हे मोठे नेते आहेत त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये किंवा आमच्याकडे आलेत तर त्यांचे स्वागत करू; पण राष्ट्रवादीचा गट सत्तेत आला तर शिवसेना सत्तेत राहणार नाही, असे  शिवसेना प्रवक्‍ते संजय शिरसाट यांनी आज स्‍पष्‍ट केले.

पत्रकार परिषदेत शिरसाट म्‍हणाले की, सर्व फोकस अजित पवारांवर गेला आहे. अजित पवार नॉटरिचेबल होणे नवे नाही. अजित पवार हे शिवसेनेत आले तरी आम्‍ही त्‍यांचे स्‍वागत करु. महाविकास आघाडीची बिघाडी होत आहे. अजित पवार आतापर्यंत काही बोलले नाहीत, त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत राहायच नाही हे स्पष्ट होत आहे. नाराजीच्या खेळात अजित पवारांना मोहरा बनवला जात आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

अजित पवारांची  नाराजी आणि कोर्टातील केस याचा काहीही संबंध नाही. त्यांच्या नाराजीची सरूवात पार्थ पवारांच्या पराभवानंतर सुरू झाली आहे. त्यांच्या सकाळच्या शपथविधी बाबत शरद पवार यांनी राष्ट्रपती राजवट लागू नये म्हणून केलेला प्रयोग होता, असे स्पष्टीकरण दिलं. पण अजित पवारांनी आजपर्यंत काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. सध्या नाराजगीचा खेळ चालला आहे त्यात अजित पवारांना मोहरा बनवला जात आहे. ते मोठे नेते आहेत ते सहजासहजी मनातील गोष्ट सांगणार नाहीत. पण महायुतीचे जे मेळावे आहेत त्यात त्यांचे स्थान कोठे आहे ते शोधावे लागते.

अजित पवारांसारख्या शिस्त पाळणाऱ्या नेत्याला नागपूरच्या सभेत बाजूला केलं गेलं. १४ ते १५ आमदार असलेल्या पक्षाच्या नेत्यांची भाषण होतात पण ५४ आमदार असलेल्या पक्षाच्या नेत्याला बोलू दिलं जात नाही, हा अजित पवारांचा अपमान आहे. अजित पवार यांनी फोन केला तरीही मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे फोन उचलत नव्हते. आघाडीची सध्या बिघाडी होत आहे. अजित पवार आतापर्यंत काही बोलले नाहीत, त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत राहायच नाही हे स्पष्ट होत. त्यांनी राष्ट्रवादी सोडली तर त्यांच स्वागत करू. पण त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचा गट सत्तेत आल्यास शिवसेना सत्तेबाहेर होईल,” असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button