मुंबई विमानतळावर १६.८० कोटींचे हेरॉईन जप्त | पुढारी

मुंबई विमानतळावर १६.८० कोटींचे हेरॉईन जप्त

मुंबई : पुढारी वृत्तसेवा विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने (कस्टम्) रविवार १६ एप्रिल रोजी कारवाई करत युगांडा येथून आलेल्या परदेशी नागरिकाकडून १६.८० कोटी रुपये किंमतीचे २.४ किलो हेरॉईन जप्त केले आहेत.

एका खोक्याच्या पोकळीत हे ड्रग्ज लपवून आणण्यात आले होते. या प्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे सीमाशुल्क विभागाने सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button