

पुढारी ऑनलाईन : उद्या नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होणार आहे. याची सर्व तयारी झाली आहे. मात्र मविआची सभा होउ नये म्हणून भाजपकडून मोर्चे काढून अडथळे निर्माण केले जात आहेत. अशी टीका ठाकरे गटाचे खासदार सजंय राऊत यांनी केली. अजित पवार हे देखील सभेला येतील असे राऊत यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. मात्र सभेत जयंत पाटील किंवा अनिल देशमुख बोलतील, त्याचा निर्णय त्यांच्या पक्षाकडून घेतला जाईल असेही ते म्हणाले त्यामुळे अनेक चर्चांना उत आला आहे.
उद्या नागपूरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे. या सभेत तीन्ही पक्षाचे नेते उपस्थित राहतील असे संजय राऊत म्हणाले. यावर पत्रकारांनी अजित पवार यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी नॉट रिचेबल होते यावर प्रश्न विचारला. यावर अजित पवार हे देखील सभेला उपस्थित राहतील मात्र सभेत जयंत पाटील किंवा अनिल देशमुख हे भाषण करतील असे ते म्हणाले. मात्र पुढे सारवासारव करताना याचा पूर्ण निर्णय त्या-त्या पक्षाकडून घेतला जाईल हे सांगायला ते विसरले नाहीत.
पुढे बोलताना त्यांनी नागपुरात मविआचांच उमेदवार निवडून येईल आणि मनपावर मविआचाच झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागपुरमधील चित्र बदलतंय याचं श्रेय गडकरींना द्याव लागेल. उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावर प्रश्न विचारला असता, होय ते महाविकास आघाडीची सभा पहायला येत आहेत. मुंबईत बसून ते नागपुरची सभा पाहतील म्हणत राऊत यांनी अमित शहा यांच्या दौऱ्यावर टीका केली. कर्नाटकमध्ये निवडणुकीआधीच भाजपच्या ठिकऱ्या उडाल्याचे दिसून आल्याची टीका राऊत यांनी केली.
हेही वाचा :