“मुख्यमंत्री अयोध्येत नकली धनुष्यबाण घेऊन फिरत होते” : संजय राऊतांची बोचरी टीका

संजय राऊत
संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येतून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील बाबरी पाडण्यात शिवसेने आणि बाळासाहेब ठाकरेंची भूमिका नव्हती, असे सांगतात. त्यांच्या विधानावर अयोध्येत नकली धनुष्यबाण घेऊन फिरणारे काय बोलतात ते ऐकायचं आहे. शिवसेना फुटल्यामुळे आणि शिंदे गट भाजपचे गुलाम झाल्याने भाजपचे लोक बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करत आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करण्याची कोणाची हिम्मत झाली नव्हती. पण शिंदे गट भाजपचे गुलाम झाल्याने चंद्रकांत पाटील आणि भाजप बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करत आहेत. बाबरी पाडण्यात बाळासाहेबांची भूमिका नव्हती हे चंद्रकांत पाटील यांच्या मुखातुन भारतीय जनता पार्टी बोलत आहे. त्यांच्या विधानावर शिंदे बोलणार का? त्यांनी राजीनामे द्यावेत. नसेल तर त्यांनी भाजपच्या सत्तेत सामील झाले असल्याचे आणि त्यांचे गुलाम झाल्याचे जाहीर करावे. शिवसेनेचे अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत आहेत, अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news