Akola tree falls incident | अकोला दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत जाहीर, राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश

Akola tree falls incident | अकोला दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत जाहीर, राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश

पुढारी ऑनलाईन : अकोला जिल्ह्यातील पारस येथे झाड पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत आणि जखमींना मोफत वैद्यकीय उपचार देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. पारस (जि.अकोला) येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली असून जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. पारस येथील या दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत. या घटनेची मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली.

दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

पारस येथील या दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत. अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामध्ये पारस येथे सभा मंडपावर झाड पडून ३० हून अधिक दबले. यात सात जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य पोहोचवण्यात आले आणि जखमींना अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, पारस येथील बाबूजी महाराज संस्थानमध्ये आरती सुरु असताना रविवारी सायंकाळी झाड कोसळले. त्यामुळे सभामंडप तुटून पडला. याठिकाणी ५० पेक्षा जास्त भाविक उपस्थित होते. यापैकी सभामंडपाखाली ३० भाविक दबले गेले. आकस्मिक घडलेल्या या घटनेनेनंतर एकच गोंधळ उडाला आणि धावपळ सुरु झाली. या घटनेची माहिती समजताच बाळापूर पोलिसांसह महसूल प्रशासनातील अधिकारी मदतीसाठी पोहोचले होते.

फडणवीस यांनी घटनेची ताबडतोब दखल घेऊन जिल्हा प्रशासन, विद्युत विभाग, महसूल विभाग व आरोग्य विभागाला सूचना दिल्या. या दुर्घटनेतील भविकांच्या निधनाबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले होते.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news