मुंबईत ३ दहशतवादी घुसल्‍याचा नियंत्रण कक्षाला कॉल; पोलिसांकडून अलर्ट जारी | पुढारी

मुंबईत ३ दहशतवादी घुसल्‍याचा नियंत्रण कक्षाला कॉल; पोलिसांकडून अलर्ट जारी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुंबईत तीन दहशतवादी घुसले असून, त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावा करणारा एक कॉल मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कॉलनंतर मुंबईत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात (शुक्रवार) दुपारी राजा ठोंगे नावाच्या व्यक्तीने कॉल केला. दुबईवरून (शुक्रवार) पहाटे तीन अतिरेकी मुंबईत आले असून, त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावा त्याने केला. यातील एकाचे नाव मुजीब सय्यद असून, त्याचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबर त्याने पोलिसांना दिला आहे. तसेच, या व्यक्तींचा दोन नंबरचा धंदा असल्याचाही दावा कॉलरने केल्याची माहिती मिळते.

गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईत दहशतवादी हल्ल्याचे, धमकीचे आणि बॉम्बस्फोट होणार असल्याची अफवा पसरवणारे कॉल आणि मेसेजेस पोलिसांना येत आहेत. त्यामुळे शुक्रवारी दुपारी आलेला कॉल हा अफवा आहे की या माहितीत काही तथ्य आहे, याची पोलीस पडताळणी करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button