Ganpati Special ST Bus Maharashtra: चाकरमान्यांसाठी खुशखबर, गणेशोत्सवात कोकणासाठी ५ हजार जादा बसेस धावणार; असं करा बुकिंग

Ganpati Special ST Bus Booking 2025: २३ ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
ST Bus Maharashtra
ST Bus MaharashtraYogesh Ratnagiri Instagram Account
Published on
Updated on

ST Bus Mumbai to Konkan Ganpati Special Ticket Booking

मुंबई : राज्यात २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५ हजार जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

नुकत्याच संपन्न झालेल्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी देखील एसटी महामंडळाने ५२०० जादा बसेस सोडल्या होत्या. त्याला भाविक - प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता गणपती उत्सवासाठी देखील एसटीने तब्बल ५ हजार जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे.

ST Bus Maharashtra
Ganesh Festival 2025: शासनाकडून वाढल्या गणेश मंडळांच्या अपेक्षा; सार्वजनिक गणेशोत्सव आता राज्य महोत्सव
Q

गणपती स्पेशल बसेसमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात सवलत मिळणार का?

A

हो. जादा बसेस मध्ये व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकीट दरात सवलत दिली जाणार आहे.

Q

गणपती स्पेशल बसेससाठी आरक्षण कधीपासून सुरू होत आहे?

A

गणपतीनिमित्त सोडल्या जाणाऱ्या जादा बसेससाठी २२ जुलै पासून आरक्षण सुरू होणार आहे.

एसटी बससाठी ऑनलाईन आरक्षण कसं करता येईल?

बसेस आरक्षणासाठी www.npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे, उपलब्ध होणार आहे.

23 ऑगस्टपासून धावणार जादा बसेस

२३ ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी ४३०० बसेस सोडण्यात आल्या होत्या. गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news