भटक्या कुत्र्यांसह इतर प्राणी समाजाचे घटक : हायकोर्ट | पुढारी

भटक्या कुत्र्यांसह इतर प्राणी समाजाचे घटक : हायकोर्ट

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : भटके कुत्रे तसेच इतर प्राणी हेसुद्धा आपल्या समाजाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्यांच्याशी क्रूरतेने वागणे किंवा तिरस्कार करणे हे योग्य नाही. या समाजात आपल्याला प्राण्यांसोबत राहावे लागेल आणि त्यांची काळजीही घ्यावी लागेल, असे महत्त्वपूर्ण मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले.

कांदिवली पश्चिमेकडील आरएनए रॉयल पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या व्यवस्थापन समितीने सोसायटीच्या आवारात भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ घालण्यास मनाई केली. त्या विरोधात परोमिता पुरथान यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सोसायटीने पुरथान यांना पार्किंग परिसरात भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ देण्यासाठी मुभा देण्याबाबत विचार करावा, असे निर्देश दिले. तसेच समितीला भटक्या प्राण्यांविषयी योग्य दृष्टिकोन ठेवण्याची तंबी दिली.

Back to top button