मुंबई-पुणे महामार्गावरील टोल दरात वाढ | पुढारी

मुंबई-पुणे महामार्गावरील टोल दरात वाढ

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल दरात 18 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. शनिवार, 1 एप्रिलपासून टोलचे नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांच्या खिशाला 50 ते 330 रुपयांची अधिकची झळ सोसावी लागणार आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर 2004 साली टोल आकारणी सुरू करताना दर तीन वर्षांनी टोलच्या दरात 18 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार, एप्रिल 2023 मधील टोलच्या दरात वाढ होत आहे. 1 एप्रिल 2023 रोजी लागू होणारे टोलचे दर हे 2030 पर्यंत कायम असतील, असे ‘एमएसआरडीसी’कडून सांगण्यात आले आहे.

कोणत्याही नव्या सुविधा नसताना तसेच वाहतूक व्यवस्थापनाची यंत्रणा नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात टोल दरवाढीवरून नाराजीही व्यक्त होत आहे. 18 टक्के वाढीच्या 2004 च्या अधिसूचनेमागे चुकीची गृहितके असल्याचे सांगण्यात येत आहे. 2004 ते 2019 या कालावधीत रस्त्यावरील वाहतूक दरवर्षी 5 टक्के दराने वाढणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. त्यानुसार कंत्राटदाराला मिळणारे निधीचे गृहितक मांडण्यात आले होते. प्रत्यक्षात कैकपटीने वाहनांची संख्या वाढल्याने कंत्राटदाराला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळाले होते.

Back to top button