चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. हे लोकशाहीचे सरळ हत्याकांड आहे. चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहे. हुकुमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
हेही वाचा
- Rahul Gandhi : 2013 चा ‘तो’ अध्यादेश फाडला नसता तर राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली नसती
- राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय द्वेष भावनेतून : ॲड. प्रकाश आंबेडकर
- Rahul Gandhi : राहुल गांधींना आणखी एक प्रकरण पडणार महागात! दिल्ली हायकोर्टाची ‘NCPCR’ला नोटीस