CM Eknath Shinde : पंतप्रधानांचा अपमान सहन करणार नाही : एकनाथ शिंदे | पुढारी

CM Eknath Shinde : पंतप्रधानांचा अपमान सहन करणार नाही : एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या फलकाला विधीमंडळाच्या बाहेर सत्ताधारी आमदारांनी जोडो मारो आंदोलन केले. त्यानंतर आक्रमक झालेल्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. तर या वादावर विधीमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन दिले.
तुम्ही जर आमच्या पंतप्रधानांचा अपमान करणार असला, तर देशातील जनता आणि आम्ही सहन तो सहन करणार नाही. सदनाचा मान सन्मान सर्वांनीच राखला पाहिजे. सर्वांनी तारतम्य बाळगलं पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे अधिवेशनात संतप्त पडसाद पडल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत निरव मोदी, ललित मोदीसारख्या भ्रष्ट लोकांविषयी एक भूमिका मांडली होती. जनतेचे पैसे लूटून हे मोदी देशाबाहेर पळून गेले हे वास्तव आहे. राहुल गांधी यांच्यावर शिक्षेची झालेली कारवाई ही केंद्र सरकारच्या दबावाखाली झाली आहे. तसेच मोदी सरकार राहुल गांधींचा वाढता प्रभाव पाहून घाबरलेले आहे. त्या भीतीपोटीच त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

राहुल गांधी यांच्यावर भाजप सरकार आकसापोटी कारवाई करत असल्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाने मुंबईत जोरदार आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणजितसिंग सप्रा, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button