“महागद्दार भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी शरद पवारांची करतात” : दादा भूसेंची जीभ घसरली | पुढारी

"महागद्दार भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी शरद पवारांची करतात" : दादा भूसेंची जीभ घसरली

पुढारी ऑनलाईन डेस्क : खासदार संजय राऊत यांच्या ट्वीटवर बोलताना कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांची जीभ घसरली. “आमच्या मतांवर निवडून आलेले महागद्दार भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी शरद पवारांची करतात” असे वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला.

अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. मंत्री दादा भुसें यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. पण दादा भूसेंनी शरद पवारांच्या नावाचा उल्लेख करण्याचा काही संबंध नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचेही शरद पवारांबद्दल वक्तव्य कसे आहे हे सर्वांना माहित आहे. दादा भूसेंनी वक्तव्य मागे घेवून दिलगीरी व्यक्त करावी, असे अजित पवार म्हणाले.

मंत्री शंभूराज देसाईंकडून पाठराखण

शरद पवार यांच्याबद्दल आदर आहे. त्यांच्या विषयी चुकीचं बोललो नाही असे दादा भूसे म्हणाले. यावर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “शरद पावारांबद्दल महाराष्ट्राला आणि देशाला आदर आहे. त्यांनी राज्याच नेतृत्व देशात केलं आहे. कृषिमंत्री म्हणून काम करताना राज्याच्या हिताचे घेतलेले निर्णय सर्वांना माहित आहेत. साखर उद्योगाच्या संबंधात त्यांचे योगदान देशाला माहित आहे. पण आमच्या मतांवर निवडून आलेले संजय राऊत आम्हाला गटारातल पाणी, डुक्कर, प्रेत म्हणातात. महागद्दार आमच्या मतावर निवडून आला आहे. त्याला आमच्याबद्दल वक्तव्य करण्याचा अधिकार नाही. आमच्या ४० मतांवर निवडून आलेल्यांनी राजीनामा देवून निवडून यावं” असे देसाई यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button