पत्नी अमृता यांच्या फसवणूक प्रकरणावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले... | पुढारी

पत्नी अमृता यांच्या फसवणूक प्रकरणावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळातील अधिवेशनानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्नी अमृता फडणवीस यांची फसवणूक प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणातील आरोपी अनिक्षा या महिलेबाबत माहिती देत असताना फडणवीस यांनी या प्रकरणातील राजकीय कटाबाबत देखील भाष्य केले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “माझ्या पत्नीला अनिक्षा नावाच्या महिलेने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. डिझायनर असणाऱ्या या महिलेने तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिने स्‍वत:च्‍या वडिलांना सोडविण्यासाठी १ कोटी रुपये देण्‍याची भाषा केली. अनोळखी नंबरवरुन कॉल करुन अमृतांना एक व्यक्ती ब्लॅकमेल करत होता. त्यानंतर अमृता यांनी हा नंबर ब्लॉक देखील केला. राजकारणात असा प्रकार लज्जास्पद आहे. हा राजकीय कट आहे की नाही, याचा खुलासा लवकरच होईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

फसवणूकीतील आरोपी अनिक्षाला अटक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची फसवणूक करुन धमकावल्याप्रकरणी आज ( दि. १६) सकाळी पोलिसांनी उल्हासनगरमध्ये छापे टाकले. या प्रकरणी उल्हासनगर येथून डिझाईनर अनिक्षा हिला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. अनिक्षा हिच्या वडिलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. उल्हासनगरमधून ताब्यात घेतलेल्या आरोपी अनिक्षा हिची अधिक चौकशी देखील सुरु आहे.

हेही वाचा

Back to top button