उद्धव ठाकरेंविरुद्धची याचिका हायकोर्टाने फेटाळली | पुढारी

उद्धव ठाकरेंविरुद्धची याचिका हायकोर्टाने फेटाळली

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप करून त्यांची ‘ईडी’ आणि सीबीआयमार्फत चौकशी करा, अशी मागणी करणाऱ्या गौरी भिडे यांची याचिका मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्याचबरोबर गौरी भिडे यांना न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याचिकेत करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचे दिसून येते. ही याचिका म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग आहे, अशी टिपण्णी न्यायालयाने याचिका फेटाळताना केली.

उद्धव ठाकरे आणि कुटुंबाने भ्रष्टाचाराच्या मार्गाने बेहिशोबी संपत्ती जमवली आहे, अशी तक्रार भिडे यांनी ११ जुलै २०२२ रोजी केली. त्याबाब भिडे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले होते. मात्र, त्यावर काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली. ठाकरे कुटुंबाविरोधात आपल्याकडे पुरावे आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई का होन नाही, असा सवाल याचिकेद्वारे करण्यात आला होता. न्यायालयाने निर्णया राखून ठेवल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने तक्रारीची प्राथमिक चौकशी सुरू केली असल्याची माहिती दिली होती. यालाही ठाकरे कुटूंबाच्या वतीने जोरदार आक्षेप घेण्यात आला. न्यायालयाने निर्णय राखून ठेवल्यानंतर सरकारने अशा प्रकारे न्यायालयाला माहिती देणे म्हणजे राज्य सरकार कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

Back to top button