मुंबई : जोगेश्वरी ओशिवरा फर्निचर मार्केटला भीषण आग; आकाशात धुराचे लाेट | पुढारी

मुंबई : जोगेश्वरी ओशिवरा फर्निचर मार्केटला भीषण आग; आकाशात धुराचे लाेट

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा जोगेश्वरी पश्चिमेकडील ओशिवरा फर्निचर मार्केटला आज (सोमवार) सकाळी अकरा वाजता भीषण आग लागली. या आगीत एस व्हीं रोड अजित ग्लास जवळील फर्निचर मार्केटचे अनेक गाळे जळून खाक झाले आहेत. आगीच्या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्‍निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

मुख्य रस्त्यावरच ही आगीची घटना घडली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी झाल्याचे पाहायला मिळत आहे. वाहतूक पोलिसांनी आता एस व्ही रोड वाहतुकीसाठी बंद केला आहे. या ठिकाणी असणारे दुकानदार या भीषण आगीपासून आपल्‍या दुकानातील माल वाचवण्यासाठी दुकानातील सामान बाहेर काढताना धडपड असल्‍याचे चित्र या ठिकाणी पहायला मिळत आहे.

हेही वाचा : 

Back to top button