विधानसभेत टॅब, तर परिषदेत नेहमीचे कागद | पुढारी

विधानसभेत टॅब, तर परिषदेत नेहमीचे कागद

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  विधानसभेत अर्थमंत्र्यांनी, तर विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडायचा प्रघात असतो. मात्र शिंदे-फडणवीस सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे राज्याला अर्थ राज्यमंत्रीच नाहीत. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्पाच्या वाचनाची जबाबदारी पार पाडली. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी टॅबमधून अर्थसंकल्प वाचला, तर विधान परिषदेत केसरकरांनी नेहमीच्या कागदी टिपणावरून अर्थसंकल्प वाचले.

अर्थसंकल्पासाठी दुपारी दोन वाजता विधान परिषद सभागृह भरले. दीपक केसरकर यांनी जवळपास दीड तास अर्थसंकल्पाचे वाचन केले. अर्थसंकल्प मांडला जात असताना भाजपचे गोपीचंद पडळकर, निरंजन डावखरे, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे, काँग्रेसचे अभिजित वंजारी आदी पूर्णवेळ टिपणे काढण्यात व्यस्त होते; तर पहिल्या रांगेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील हेही आवर्जून टिपणे काढत असल्याचे दिसले.

Back to top button