Geyser Gas Leak : गॅस गिझर लिक झाल्यामुळे नवविवाहित जोडप्याचा गुदमरून मृत्यू | पुढारी

Geyser Gas Leak : गॅस गिझर लिक झाल्यामुळे नवविवाहित जोडप्याचा गुदमरून मृत्यू

पुढारी ऑनलाइन डेस्क : Geyser Gas Leak : मुंबईतील घाटकोपर येथे एका नवविवाहित जोडप्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. दीपक शाह (40) आणि टीना शाह (35) अशी मयतांची नावे आहेत. ते घाटकोपरच्या कुकरेजा टॉवर्समध्ये भाड्याने घेतलेल्या फ्लॅडमध्ये राहत होते. गॅस गिझर लिक झाल्यामुळे गुदमरून दोघांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या नवविवाहित शाह दाम्पत्याचे नातेवाईक शेजारच्याच फ्लॅटमध्ये राहत होते. त्यांनी ब-याच वेळा बेल दाबूनही कोणीही दरवाजा उघडला नाही. तसेच त्यांनी अनेकदा त्यांना मोबाईलवर कॉल करूनही कोणीही उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
पंतनगर पोलिसांनी माहिती मिळताच, घटनास्थळी धाव घेतली. पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस पंत नगर रविदत्त सावंत यांनी डुप्लिकेट चावीने फ्लॅटचे दार उघडले. आतमध्ये गेल्यावर दोन्ही जोडपे जमिनीवर मृतावस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, पंतनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून मयतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचा :

देवेंद्रजींचा फोन..कर्डिलेंचा डाव…विखेंची जादू ! भाजपने फडकाविला जिल्हा बँकेवर झेंडा

अनंत गीतेंना मुंबईतून लोकसभेची उमेदवारी तर रायगड राष्ट्रवादीकडेच राहणार !

Back to top button