समाजातील द्वेष, वाईट विचार होळीत नष्ट होवोत : अजित पवार | पुढारी

समाजातील द्वेष, वाईट विचार होळीत नष्ट होवोत : अजित पवार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा: यंदाची होळी समस्त महाराष्ट्रवासियांच्या जीवनात रंगांची उधळण, आनंदाची बहार घेऊन येवो. समाजातील द्वेषभावना, वाईट विचारांचं होळीत दहन होऊन नष्ट होवोत. परस्परातील स्नेह, आपुलकी, बंधुत्वाची भावना वाढीस लागो. समाजात उत्साह, चैतन्याचं वातावरण निर्माण होवो, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (दि.६) होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.

अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, राज्यातल्या गावागावात, देश-विदेशात साजरा होणाऱ्या होळी, धुलीवंदनाच्या सणाला प्राचीन संदर्भ, ऐतिहासिक महत्व आहे. सर्वांना एकत्र आणणारा, समाजातील एकता, बंधुता, समानतेची भावना वाढीस लावणारा, निसर्गाचं महत्व सांगणारा हा सण आहे. सर्वांचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचं भान ठेवूनचं हा सण साजरा केला पाहिजे. होळीसाठी वृक्षतोड न करणे, धुलीवंदनासाठी नैसर्गिक रंगाांचा वापर करणे, रंग लावताना डोळ्यांना, शरीराला इजा होणार नाही, याची काळजी घेणे, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत, सर्वांनी हा सण आनंदाने, उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.

हेही वाचा 

Back to top button