

मुंबई : पुढारी वृत्तसेवा इयत्ता तिसरी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकात धडे कविता, घटक झाल्यानंतर दोन वह्यांची पाने समाविष्ट होणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने पथदर्शी निर्णय घेतला असून याची सुरुवात येत्या २०२३ २४ या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे.
शिक्षण व शिक्षणाचे साहित्य त्यांचे सार्वत्रिकरण होणे, पाठ्यपुस्तके व वह्या यांच्या वजनाने दप्तराचे ओझे वाढले जाणे, दप्तराच्या वाढत्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम आदी मुद्यांचा विचार करून सखोल चर्चेअंती पाठ्यपुस्तकात वह्यांची पाने जोडण्याचा हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे खरे मात्र यामुळे शंभर-दीडशे पानांच्या पुस्तकात आणखी तीतकीच पाने जोडली जावून वजन वाढेल हे विभागाच्या लक्षात आलेले दिसत नाही
तिसरी ते आठवीची पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरूपात ४ भागांमध्ये विभागली जातील. प्रत्येक घटक / पाठ / कविता या नंतर वहीचे १ पान समाविष्टकरण्यात येईल. पहिली व दुसरीची पाठ्यपुस्तके सुध्दा ४ भागांमध्ये विभागण्यात येतील. पाठ्यपुस्तकांमध्येही वह्यांची पाने समाविष्ट करण्याची भविष्यात मागणी झाल्यास पुढील शैक्षणिक वर्षापासून वह्यांची पाने पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याने पुस्तकांचे आकारमान, वजन व किंमत वाढणार आहे.
हेही वाचा