मुंबई; पुढारी ऑनलाईन दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांच्यावर केलेल्या कारवाईवरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. विरोधकांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण हा सत्ताधाऱ्यांचा खेळ झाला आहे अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली. जनतेला हे सर्व माहिती असून, आम्ही जनतेसाठी आणि जनतेच्या प्रश्नासाठी लढत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आजपासून विधिमंडळाच्या अर्थसकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणातील माहितीवर आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला. राज्यपालांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. तसेच राज्यपालांच्या अभिभाषणातील काही माहिती चुकीची असल्याचं ते म्हणाले.
विद्यमान सरकारकडून फक्त घोषणा करण्यात येत आहेत. हे फक्त घोषणांचे सरकार आहे. या अधिवेशनातही सरकारकडून फक्त घोषणाच केल्या जातील. मात्र जनतेचे प्रश्न मांडणे हे आमचे काम आहे आणि ते आम्ही सभागृहात मांडू असे ते म्हणाले.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर केलेल्या कारवाईवरून आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. देशात तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. या तपास यंत्रणांचा ससेमिरा लावणे हा सरकारचा खेळ बनल्याची टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली.
हेही वाचा :