क्रौर्याची परिसीमा : शिक्षण बंद करण्‍यासाठी इराणमध्‍ये मुलींवर विषप्रयोग! | पुढारी

क्रौर्याची परिसीमा : शिक्षण बंद करण्‍यासाठी इराणमध्‍ये मुलींवर विषप्रयोग!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मुलींचे शिक्षण बंद व्‍हावे, यासाठी इराणमधील कौम शहरात मुलींना विष देण्‍यात आल्‍याची धक्‍कादायक माहिती चौकशीत उघड झाली आहे.  नोव्‍हेंबर २०२२ मध्‍ये कौम शहरात शेकडो मुलींना एकाचवेळी बिषबाधेचा त्रास झाला होता. या प्रकाराने देशात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी आरोग्‍यमंत्री युनेस पनाही यांनी खुलासा केला आहे. मुलींची शाळा बंद करण्‍यासाठीच त्‍यांना विष देण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे. ( Girls Poisoned In Iran )

इराणमधील सरकारी वृत्तसंस्‍था ‘आयआरएनए’शी बोलताना आरोग्‍य मंत्री युनेस पनाही यांनी सांगितले की, कौम शहरातील शेकडो मुलींना विषबाधेचा त्रास झाला होता. नोव्‍हेंबर २०२२ मधील या प्रकाराने देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाची चौकशी करण्‍यात आली. यावेळी मुलींना शाळेत जाण्‍यापासून रोखण्‍यासाठी त्‍यांना विष देण्‍यात आल्‍याची माहिती चौकशीत उघड झाली आहे. या प्रकरणी अद्‍याप कोणालाही अटक करण्‍यात आलेली नाही. ( Girls Poisoned In Iran )

ज्‍या मुलींना विषबाधेचा त्रास झाला त्‍यांच्‍या आईवडिलांनी शहराबाहेर निदर्शने केली होती. यावेळी सरकारने या प्रकरणाच्‍या सखोल चौकशीची ग्‍वाही दिली होती. यानंतर सरकारने या संपूर्ण प्रकरणाच्‍या न्‍यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते.

हेही वाचा : 

 

 

Back to top button