'व्हीप'ची धमकी आम्हाला देवू नका : भास्कर जाधव | पुढारी

'व्हीप'ची धमकी आम्हाला देवू नका : भास्कर जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री पद, ४० आमदार, १३ खासदार आमच्यातून शिंदे गटात गेले, आमची सुरक्षा काढून घेतली, माझ घर जाळण्याचा प्रयत्न झाला, अशा गोष्टींना आम्ही घाबरलो नाही. अशा ‘व्हिप’ला आम्ही घाबरत नाही, ‘व्हीप’ची धमकी आम्हाला देवू नका, असे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. आजपासून (दि.२७) विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. तत्पुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी आमदार जाधव म्हणाले की, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं आणि त्यानंतर घडलेल्या घटना यांना आम्ही कधी घाबरलो नाही. त्यामुळे व्हीप दिला यावरून आम्हाला धमकी देवू नका. शिंदे गटाच्या मंडळींना पंक्षांतर बंदीबाबत बोलण्याचा अधिकार नाही. हे सत्तापिपासू लोक आहेत. येणारी निवडणूक सत्तेचा वापर करून जिंकायची, एवढच यांना माहित आहे. ही विकृती आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देण- घेण नाही, असेही जाधव यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button