Milk price : मुंबईत पुन्हा दूध दर वाढ; १ मार्चपासून | पुढारी

Milk price : मुंबईत पुन्हा दूध दर वाढ; १ मार्चपासून

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईत पुन्हा एकदा दूध दरवाढ झाली आहे. बॉम्बे मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशनने (बीएमपीए) (Bombay Milk Producers Association (BMPA)  म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात ८० रुपयांवरून ८५ रुपये प्रतिलिटर दरात पाच रुपयांची वाढ जाहीर केली आहे. दूध दरवाढीचा निर्णय गुरुवारी (दि.२३) उशीरा मुंबई दूध उत्पादक संघाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. ही वाढ १ मार्च पासून लागू होणार आहे. वाचा सविस्तर बातमी. (Milk price)

असोसिएशनचे प्रवक्ते सी के सिंग म्हणाले, “दुभती जनावरे आणि त्यांच्या चाऱ्याच्या किमतीत १५-२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गवत आणि पेंढाही खूप महाग आहे. त्यामुळे घाऊक किंमत ८० ते ८५ रुपयांपर्यंत वाढवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. हा सुधारित दर १ मार्च ते ३१ ऑगस्ट या कालावधीत लागू होईल. पुरवठादारांचे म्हणणे आहे की तो दिवस दूर नाही जेव्हा म्हशीच्या दुधाला १०० रुपये प्रतिलिटर दर मिळेल. सप्टेंबर २०२२ दुध दरवाढीचा विचार करता ही सर्वात मोठी वाढ ठरली आहे.

हेही वाचा

Back to top button