मुंबई: पवई सुवर्ण मंदिराजवळ रस्ता खचला; वाहतूक विस्कळीत | पुढारी

मुंबई: पवई सुवर्ण मंदिराजवळ रस्ता खचला; वाहतूक विस्कळीत

पवई, पुढारी वृत्तसेवा: पवई जेव्हीएलआर द्रुतगती मार्गावर पवई सुवर्ण मंदिराजवळ अचानक रस्ता खचल्याने वाहनचालकांची एकच तारांबळ उडाली. यामुळे विक्रोळीकडून अंधेरीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही दिवसांपूर्वी येथे पालिकेने काम केले होते. मात्र त्यावर निकृष्ट दर्जाचा रस्ता केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. अचानक रस्ता खचल्याने जेवीएलआरवर वाहतूक कोंडी झाली.  पालिका अधिकारी, वाहतूक पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आहेत. रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button