जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सीबीआय चौकशी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली | पुढारी

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सीबीआय चौकशी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

ठाणे : पुढारी वृत्तसेवा; राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. या प्रकरणी सीबीआय अथवा अन्य यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. त्यावर आज (दि.२४) सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीची मागणी फेटाळून लावली. तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास करून तीन महिन्यांच्या आत ट्रायल कोर्टासमोर अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने अनंत करमुसे यांची याचिका फेटाळून लावत त्यांच्या हेतूबाबत प्रश्नचिन्ह उभे केले. त्यानंतर करमुसे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून ठाण्यातील पोलिसांवर अविश्वास दाखवत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.  त्यावर सुनावणी सुरु आहे.

मारहाण प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने पुढील तपास करण्याचे आणि ट्रायल कोर्टासमोर तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. अनंत करमुसे प्रकरणात कायद्यानुसार खटला चालवण्याचे निर्देशही ट्रायल कोर्टाला दिले आहेत.

हेही वाचा 

Back to top button